जिथे भरलं जात तुमच्या पंखात बळ, तुम्हाला मिळते तुमची नवी ओळख, जिद्दीनं लढण्याची ताकद आणि स्वावलंबी होऊन मानानं जगण्याची उमेद हे सगळं काही मिळणारं तुमचं हक्काचं ठिकाण म्हणजे, कौशल्यम्! तुमच्या जिद्दीला आणि चिकाटीला योग्य दिशा देणारा, तुमच्या क्षमतांची नव्यानं ओळख करून देणारा आणि नवनवीन रोजगार संधींसाठी त्यांना सक्षम करणारा, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि लाईटहाऊस यांनी एकत्र येऊन सुरू केलेला हा अभिनव उपक्रम.
तुमचे जर १०वी १२वी किंवा पदवीपर्यंतचे बेसिक शिक्षण झाले असेल आणि तुम्हाला काम करण्याची इच्छा असेल तर तुमचे स्किल्स डेव्हलप करून तुमच्यासाठी १००% नोकरीची संधी उपलब्ध करून देणारा असा हा उपक्रम म्हणजे कौशल्यम्. इथे १०० हून अधिक स्किल पार्टनर्ससह तुम्ही तुमच्या आवडीचा,योग्यतेचा व क्षमतेशी जुळणारा कोर्स निवडू शकता. तसेच आमच्या फाऊंडेशनल कोर्ससह तुम्ही तुमची संवाद कौशल्य, कॉम्प्युटरचे बेसिक शिक्षण व आवश्यक ती कौशल्ये डेव्हलप करु शकता.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि लाईटहाऊस यांनी एकत्र येऊन अनेक गरजू युवांसाठी 'कौशल्यम्' नावाचा एक अनोखा उपक्रम सुरु केला आहे. जर तुमचे वय १८ ते ३० वयोगटात असेल, १०वी १२वी किंवा पदवीपर्यंतचे बेसिक शिक्षण झाले असेल व तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही नामी संधी आहे. तुम्हांला नोकरीकरिता सक्षम व स्वावलंबी करण्यासाठीचा आमचा हा प्रयत्न आहे. यात आम्ही तुम्हांला २० तासांचा फाऊंडेशन कोर्स ऑफर करतो. ज्यात तुमच्या संवाद कौशल्य व डिजिटल साक्षरतेवर काम करत तुम्हांला जॉबरेडी केले जाते. त्याचबरोबर तुम्हांला नोकरी मिळाल्यानंतरही तुमच्या प्रगतीसाठी आणि साहाय्यासाठी आम्ही तुमच्याशी जोडलेले राहतो.
01 | प्री- स्कूल टीचर | Education |
02 | अकाऊंट एक्झिक्युटिव | MSME |
03 | मेकॅनिक | Automotive |
04 | असेम्ब्ली लाइन/ प्रॉडक्शन /क्वालिटी अँड मेंटेनन्स ट्रेनी | Manufacturing |
05 | कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव | Retail |
06 | पिकर /पॅकर / सॉर्टर | E-commerce |
07 | सेल्स ऑफिसर /ब्रांच एक्झिक्युटिव | Financial Services |
08 | के.वाय.सी ऑफिसर | Financial Services |
09 | नर्सिंग असिस्टंट / जनरल ड्यूटि असिस्टंट | Hospital |
10 | सी.एन.सी ऑपरेटर | MSME |
11 | इ.व्ही टेक्निशियन | Automotive |
12 | बिलिंग एक्झिक्युटि | Hospital |
13 | इलेक्ट्रॉनिक्स असेम्ब्ली अँड सोलडेरिंग ओपरेटर | MSME |
14 | कस्टमर सर्विस असोसिएट | MSME |
15 | फिटनेस ट्रेनर | Healthcare |
16 | टू व्हीलर मेकॅनिक | Automotive |
तुमची स्वतःची ओळख निर्माण करताना आणि जिद्दीनं तुमच्या करियरमध्ये सक्षमतेनं उभं राहताना, कौशल्यम् तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे.तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी, वेगवेगळे स्किलिंग कोर्सेस, जॉबच्या संधीसाठी आजच लाईटहाऊस सेंटरमध्ये रजिस्टर करा.आमचे को-ऑर्डिनेटर्स/समन्वयक तुमच्याशी संपर्क साधतील.
आपण कोणत्या प्रकारची नोकरी किंवा स्किल्स निवडून करिअर घडवू शकतो याबाबत तुम्हांला प्रश्न आहेत?
तर आजच लाईटहाऊसच्या तुमच्या जवळच्या काऊन्सिलिंग सेंटरला भेट द्या. आमचे काऊन्सिलर तुम्ही कोणता कोर्स करावा याकरिता मार्गदर्शन करतील.